STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Abstract Romance Tragedy

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Abstract Romance Tragedy

दिलातील निरागस चेहरा

दिलातील निरागस चेहरा

1 min
233

 खूप विश्वास ठेवून, 

मी केले होते प्रेम तुझ्यावर,

अर्ध्यातच सोडून मला

का गेलीस जरा सांगशील का?

कशाला वेळ दिला मला

सागरी किनाऱ्यावर भेटण्यासाठी,

उगाच खिन्न होऊन इथे

बसलो मी तुझ्या प्रतिक्षेत...

किती वाट पाहू तुझी मी

या सागरी किनारी,

काय करु आता लाल गुलाबाचे?

जे तुझ्यासाठी आणले होते.

मन पाखरू वेल्हाळ माझा

किती तडफडतो तुझ्यासाठी

मनी स्वप्नात पाहे तुला

क्षितिजावर टेकलेल्या दिलात

निरागस चेहऱ्यात….

काय झाले तुला

काही मला सांगशील का?

उचल एकदातरी माझा काॅल

काय आहे तुला अडचण….।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract