STORYMIRROR

Jyoti gosavi

Romance

4  

Jyoti gosavi

Romance

धुंद स्वप्ने

धुंद स्वप्ने

1 min
496

तू दवाने नाहलेली

चिंब ओलेती पहाट

थरथरते तुझी तनू

मी होतो झंजावात


जेव्हा तू दीपशिखा

मी पतंग प्रेमवेडा

मी धुंद नागराज

तू सुगंधी केवडा


जेव्हा मी सागर

तू अवखळ सरीता

वेड्या लाटा ओढ घेती

किनाऱ्याच्या भेटी करता


तुझे स्वप्नील डोळे

अजूनही भासतात

तुझ्या गालावरल्या खळ्या

माझ्या मनात हासतात


आकाशाची निळाई

आणि भावूकता स्वप्नांची

प्रत्येक हळव्या शब्दात

ओढ माझ्या मिलनाची


धुंद होतो स्वप्नी

हात तुझा हाती घेता

कशी सांगू सखे तुला

माझ्या मनीची आर्तता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance