STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Classics

3  

Neha Ranalkar(Nawate)

Classics

धुंद झाल्या दिशा

धुंद झाल्या दिशा

1 min
409


बरसल्या पावसाच्या धारा

पसरे मृद्गंध चोहीकडे

धुंद झाल्या दिशा क्षणार्धात

भिजून चिंब झाली धरणी

आनंदली सृष्टी सर्वांगात


संधिकाल ही आला जवळी

पाखरे परतली खोप्यात

अंधारून येता ती रजनी

जाई रवी क्षितिजापल्याड

पल्लवित होता आशा मनी


सांजवात लागे देव्हा-यात

रातराणी आली बहरूनी

दरवळे गंध दारोदारी

शृंगाराचा चढवित साज

करी चाफेकळी बरोबरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics