STORYMIRROR

Mangesh Medhi

Abstract Drama Inspirational

3  

Mangesh Medhi

Abstract Drama Inspirational

धरती हिरवाई

धरती हिरवाई

1 min
238

आदिशक्ति आदिमाया आदिविद्या भगवती

अनंतरुपी सर्वस्थित सर्वस्वरुपिणी

उत्पत्ती स्थिती लयकारणी

जननी अवनी भूमी |

मूलाधार धरणी

धरती हिरवाई माता धरती माता


अतुट तव ममता बंध |

निश्चिंत तव कुशीत स्वस्थ 

अल्हाद हिरवाईत वसे

नटते फळ फुलांनी |

बहरुनी वनराई जसा

शालू हिरवा नेसूनी


जननी अवनी भूमी |

मूलाधार धरणी

धरती हिरवाई माता धरती माता


करुणामयी सहनशील ममतामयी

क्षमाशील दयाशील धैर्यशील 

विशालरुप कृपादृष्टी सृष्टीरुपी

अन्नपूर्णा परिपूर्ण स्वयंपूर्ण 

फलदायी प्राणजीवनदायी वरदायीनी


जननी अवनी भूमी |

मूलाधार धरणी

धरती हिरवाई माता धरती माता


करंटे आम्ही लेकरे तुझी

दुराचारी अत्याचारी घातकी क्रूर

नासवती तुडवती जाळती

मिटवू पाही नित्य तुझा, निसर्ग श्रृंगार


जननी अवनी भूमी |

मूलाधार धरणी

धरती हिरवाई माता धरती माता


जाणतो ना ईतुकेसे आम्ही

आपल्याच साठी सारे परी

आपले काहीच नाही

वैर शत्रुत्व युद्ध व्यर्थ 

प्रेम बंधुता सहयोग खरे

मानवता संतोष शांती नांदे


जननी अवनी भूमी |

मूलाधार धरणी

धरती हिरवाई माता धरती माता


आहो असे कृतघ्न आम्ही तरी

तू तशीच मायाळू भू-माऊली

शांत सुंदर मनमोहक

बहरुनी टवटवीत हिरवी

पोसते भरविते भागविते

नित्य आमुची तहान भूक


आदिशक्ति आदिमाया आदिविद्या भगवती

अनंतरुपी सर्वस्थित सर्वस्वरुपिणी

जननी अवनी भूमी |

मूलाधार धरणी

धरती हिरवाई माता धरती माता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract