देश प्रेम
देश प्रेम
आम्हीच भारतीय देशाचे खरे मावळे,
या मातीसाठीच आम्ही जगावे-मरावे.
अशोक,राणा,शिवाजी-संभाजी सांगुन गेले,
या मातीचे ऋण याचं जन्मी कशे फेडावे ?.
आम्ही सारे भारतीय याचं मातीची संतान,
तिच्या रक्षणांसाठी सदैव आमचे त्तपर प्राण.
रक्ताच्या नात्या पलिकडे आहे तीचेच ऋण,
तीच्या साठीचं आम्ही करावे सर्वस्व अर्पण.
डोंगर, पर्वत,नदी-नाले, हिमालय,वन,
तीन बाजूंनी अथांग सागरांचे भूषण.
जीव-जंतु,विविध पक्षी, वनस्पती-प्राणी,
हेच आहे प्रत्येक मावळ्याचे खरे धन.
तीच्या अस्तित्वातचं आमचे संरक्षण,
म्हणुन नैसर्गिक संपतीचे करावे जतन.
थांबवावे अनाप-शनाप खनिजांचे दोहन,
भारतीयांना मग मिळेल शुध्द वातावरण.
सर्व भारतीयां मध्ये बंधुभाव कायम असावा,
शिल्लक कारणासाठी कधी नसावा दुरावा.
आपल्याचं कर्तृवाने देशाचा विकास करावा,
अंधश्रध्दा, मृतरुढी,मनभेदाचा त्याग करावा.
हक्का पेक्षा अधिक महत्व कर्माला द्यावे,
भू-मातीचे ऋण निःस्वार्थ मनाने फेडावे.
याच्या पेक्षा काय आगळे-वेगळे करावे,
देश-प्रेमाचे हेचं आमचे खरे ध्येय असावे.
ज्ञान, आरोग्य, ऐश्र्वर्य, शांती,समाधान,
न्याय,बंधुत्व व सौख्य,मनात विराजमान,
प्रत्येक मावळाने बाळगांवे हेचं प्रण,
भारत देशच असणार मगं विश्र्वात महान.
