STORYMIRROR

कवी निलेश राठोड

Tragedy

3  

कवी निलेश राठोड

Tragedy

देश माझा

देश माझा

1 min
12.9K




देश माझा आजही पारतंत्र्यात आहे ।

लोक माझे आजही अंधश्रद्धेत आहे ।


भ्रष्टाचाररूपी शत्रू आजही जिवंत आहे ।

कायद्याने त्यांना मला आळा घालायचा आहे।


लढून अन्यायाविरुद्ध स्वातंत्र्य मला मिळवायचे आहे ।

रक्षा मला मातृभूची या नराधमांकडून करायची आहे ।


संविधान मला परत एकदा समजून घ्यायचे आहे ।

पेटवण्या निघाले संविधान त्यांना एकदा बघायचे आहे ।


सर्वधर्म-समभाव पुन्हा प्रस्थापित मला करायचे आहे ।

जातीयतेच्या दंगलीवर अंकुश मला ठेवायचा आहे ।


पांग फेडण्या मातृभूचे जन्म पुन्हा मला घ्यायचा आहे ।

पुन्हा त्या नराधमांना देश भक्ती मला दखवायची आहे ।



Rate this content
Log in

More marathi poem from कवी निलेश राठोड

Similar marathi poem from Tragedy