डॉ. एपीजे अब्दुल कलाम
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
तुम्हा आमचा मनापासून सलाम ।धृ।
जिवापाड मेहनत करूनी
तुम्ही ज्ञान मिळविले
बनुनी तुम्ही संशोधक
कित्येक शोध लावियले
राष्ट्रपती नव्हते तूम्ही हो आम ।1।
तुम्हा आमचा मनापासून सलाम …
अग्णीबाण तयार करूनी
झाले हो मिसाईलमॅन
कर्तृत्व पाहूनी तुमचे
सारे झालेत तुमचे फॅन
चाकोरी बाहेर केले तुम्ही काम ।2।
तुम्हा आमचा मनापासून सलाम …
आजन्म राबूनी तुम्ही
केली हो देशसेवा
आजही कित्येकांना
वाटतो तुमचा हेवा
आगळे व्यक्तीमत्व म्हणून जगात नाम ।3।
तुम्हा आमचा मनापासून सलाम …

