STORYMIRROR

Anupama TawarRokade

Romance

3  

Anupama TawarRokade

Romance

डोळे

डोळे

1 min
371

काही तू न बोलता 

डोळे तुझे बोलती

शब्द लाजिरवाणे

पापण्या ओलावती


खुणवी डोळ्यातील

पाणी बरेच काही

कल्लोळ भावनांचा

मज उसंत नाही


मिटले जरी डोळे

मज सांगती गुज

एकते मी बरेच

तुझी रे कुजबुज


शब्द व्यर्थ सारेच

मज ठाऊक आहे

बोलकी ही नजर

आज अबोल आहे


मज भूलविणार

नाही रे आता असे

डोळे खुणविणार 

मनात तुझ्या जसे


तुझे न बोलण्याचे 

सदा असे बहाणे

प्रेम माझे अबोल

जाणते हे शहाणे


नाही गरज मज

शब्दांनी जाणण्याची

आहे मी ओळखून

दुःख तुझ्या मनीची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance