डोहाळे हे खुर्चीचे
डोहाळे हे खुर्चीचे
डोहाळे हे खुर्चीचे
भल्या भल्यांना लागले
साक्षर असो वा निरक्षर
मोह हा खुर्चीचा न आवरे...
खुर्ची ती मोलाची
आहे फार जबाबदारीची
कार्य आपले त्याप्रती
असे फार निष्ठेची...
पण,खेद होते याचे
डोहाळे लागते त्या खुर्चीचे
निती फिरती सत्ताधार्याची
विसर पडतो खुर्चीप्रती असणार्या कर्तव्याची...
खुर्चीप्रती असणारी कर्तव्य टाळूनी
भरत असे स्वतः हा झोळी
हेच त्याचे कर्तव्य मानती
यातच ते धन्यता समजती...
खुर्ची ही सेवेची
दूर्दैवाने लागते त्याचे डोहाळे
अन् जन्म घेती मग ही दूरबुध्दी माणसाची
