पृथ्वीचे मनोगत कवितेतून
पृथ्वीचे मनोगत कवितेतून
कुठवर सहन करायचे
मी आणि माझ्या लेकरांनी
मानवांकडून होणारा हा बलात्कार
कोणी देईल का आन्हाला न्याय?
विकासाच्या नावाखाली हा मानव रोज करतो आमच्यावर अत्याचार
माझ्या लेकरांवर करतो कुराडीने वार
अन् जीवे मारतो त्याला क्षणात
जमिन करून ती भूईसपाट
बांधतो स्वतः हा चे घर अलिशान
कुठवर सहन करायचं माझ्या या झाडांनी
लेक माझी ती सरीता
जगवते तुम्हा सर्व सजीवांना
आणि तुम्ही मानव प्रदुषण करूनी करता तिची अशुद्धता
कुठवर सहन करायचं माझ्या लेकीने
सुखसोयी तुमच्या होतात उपभोगून
होते प्रदुषण त्यामुळे हे
पण माझी सर्व लेकरे भोगतात
त्याचा त्रास क्षणोक्षणी हे
कुठवर सहन करायचे
आम्ही मानवांकडून होणारा हा अन्याय
~~~~~~~~~~~~~~~~~
सोनाली चंदनशिवे
सोलापूर
