इंद्रधनुष्य
इंद्रधनुष्य
1 min
337
श्रावण सारख्या पवित्र महिन्यात
ऊन-पावसाच्या खेळामध्ये तू येतोस
तुझ्या या काही मिनिटांच्या दर्शनानेच तू लहानापासून मोठ्यांपर्यत आनंद देऊन जातोस
तुझे सप्तरंग नजरेस पडल्यास मन बहरून जाते.
पण आता तुझे दर्शन होतच नाही
तुझे सप्तरंग नजरेस पडत नाही
लहान मुलांना तर इंद्रधनुष्य काय?
हे सुद्धा थोड्या वर्षानी कळणार नाही कारण आता तू पूर्णपणे हरवला आहेस
तुला शोधावे तर कसे?
कारण
ऊन-पावसाचे खेळच बंद झाले आहे.
~~~~~~~~~~~~~~~~
सोनाली चंदनशिवे
सोलापूर
