STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

डीजे

डीजे

1 min
637


मज राणी तुझा होकार मिळाला 

अगं बघ गावात डीजे वाजू लागला...

वर्ष झालं तुझ्यामागे जीव फिरला 

आज मी प्रेमाचा डाव चांगला घेरला 

तुला पाहून माझा रुबाब लाजू लागला...


म्हणतात तू मला लाखात एक भेटली 

अगं तुझ्या प्रेमाची ईच्छा मनात दाटली 

तुझ्या रुपाला साधा शृंगार साजू लागला...


लावली होती पैज मी तुला मिळवण्याची 

तुझ्या माझ्या हाताची रेषा जुळवण्याची 

तुझा नखरा मला आज पाणी पाजू लागला...


तू मिळालीस मला जन्माचं सुख लाभलं 

संगमच्या नावासोबत तुझंच नाव शोभलं

आपल्या लग्नाचा चर्चा गावात गाजू लागला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance