दान
दान
दान
पावसाचे दान मिळाले धरतीला |
चिंब भिजून ती लागली पिकाचा तयारीला |
आवाज दिला तिने शेतकरी राजाला |
सांगू लागली नांगर तुझ्या जमिनीला |
शेतकरी राजाने ओ दिला तिच्या हाकेला |
डवर वखर घेऊन लागला तो कामाला |
पावसाने दान दिले धरतीला |
चिंब भिजून ती लागली पिकाच्या तयारीला ||
बी पेरून पाहू लागला तो आभाळाला |
आभाळ म्हणाले सांग पाहू तू ढगाला |
ढग सज्ज झाले पाऊस पाडायला |
गडगडतांना आवाज आला..सांग पाहू तू माणसाला |
वृक्ष लावायला, जंगल तोड थांबवायला |
जंगल तोड थांबवायला ||