देऊळ
देऊळ
1 min
1.3K
उडत्या पक्ष्यांचे थवे आकाशी बिलगती |
दगडात कोरलेल्या सुंदर देवतांच्या मूर्ती।।
कळी उमलली गुलाबाची दरवळला सुगंध |
आवाज भ्रमरा चा वाजवि तो मृदंग।।
मनाच्या गाभाऱ्यात उभा पांडुरंग |
पाहता नभी दिसे सप्तरंग।।
सांजवेळी दिवस सोडतो संथ श्वास |
गोधन परतती घराकडे होई हा भास।।
ऐकू येई देऊळात तो घंटीचा नाद |
सारे मिळून घेऊ प्रसादाचा आस्वाद.. प्रसादाचा आस्वाद।।