STORYMIRROR

Geeta Nirwan

Others

3.7  

Geeta Nirwan

Others

आभाळ

आभाळ

1 min
2.2K



आभाळ बोलते काही

ढगांनाही उमजत नाही

होते आताच ते निरभ्र

काळोखात हरविले ते शुभ्र ||१||


आभाळ बोलते काही

ढग दाटले नभी जरी

वाट पाहते पावसाच्या सरी

धरतीवर येण्याची घाईच बरी ||२||


आभाळ बोलते काही

धुंद वारा हा सैरावैरा वाही

ढगांचा गडगडाट लई

भरलेले आभाळ क्षणात रिते होई ||३||


आभाळ बोलते काही

सरकन विज चमकुनी पाही

पावसाच्या मग त्या सरी

न बरसताच निघून जाई माघारी ||४||


Rate this content
Log in

More marathi poem from Geeta Nirwan