चंद्रकला, टिपक्यांची
चंद्रकला, टिपक्यांची
"मी नक्षत्राची नक्षी"
नेसली मी आज साडी
चंद्रकळा टिपक्याची
पैठनी माझी भरजरी
ही रेशमी धाग्याची..
साजनासाठी रंगले शृंगाराने मढले..
दिलबरा ,माझ्या दिलात ठसलाय राजा...
टिपक्यांची शोभा ही चोळीला
कशिदयाची जरी साडीला
नाद करती पायी पैंजन
पाटल्या,बंद,हाती कंकन ..
केला शृंगार मी ,गाजविला दरबार मी
दिलबरा ,माझ्या दिलात ठसलाय राजा...
दिसते मी नक्षत्राची नक्षी
सौंदर्याला माझ्या साक्षी
चंद्र तारका पाहे नजारा
प्रितीचा पिते अंगुरी सुरा..
चला रास खेळू सजना,धूंदावली काया..
दिलबरा ,माझ्या दिलात ठसलाय राजा...
प्रणयाची रात नशीली
रूप रंग यौवन मढली
छेडली वरी राग भूपाळी
आरपार ईश्कान वेढली..
तुम्हावर जडली माझी भारलेली प्रीती..
दिलबरा ,माझ्या दिलात ठसलाय राजा...

