STORYMIRROR

Suryakant Majalkar

Fantasy

3  

Suryakant Majalkar

Fantasy

चंचल...

चंचल...

1 min
14.8K


चंचल अवखळ तरी लाजरी

सुशील, सुंदर आणि हसरी

फुंका कोणी स्वानंदे तुतारी

छेडा कोणी मधुर बासरी (१)


होई तिचा क्षण न क्षण सखा

होई तिची पूर्ण प्रत्येक इच्छा

असो तो सागर ती मग सरिता

आम्ही बिंदू ती जीवन रेखा (२)


उदंड लाभो आयुष्य तुजला

साथ सदैव मित्र परिवाराला

बाल्य तुझ्यातले मन स्पर्शते

बोलणे तुझे ह्रदयास भिडते (३)


प्रयत्न तोकडा तुझ्यासाठी

लिहिता झालो प्रेमापोटी

शब्दांची केली ऐशी दैना

कविता केली मोद मना (४)


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Fantasy