STORYMIRROR

Suryakant Majalkar

Others

3  

Suryakant Majalkar

Others

अहंकार गळाला

अहंकार गळाला

1 min
666


मम् अहंकार गळाला

पार धुळीला मिळाला


कौतुक हुशारीचे होते

क्वचित फुशारकीचे होते

तो विषारी पाश गळाला

पार धुळीला मिळाला


अनेतेपण पदरी आले

अनुयायी सोडून गेले

तो ध्वज अर्धावर आला

पार धुळीला मिळाला


माझे काहीच नव्हते

त्यांचे स्वस्तित्व होते

तो मार्गस्थ झाला

मम् अहंकार गळाला


किम्मत बाजारी शून्य

पाप अधिक नगण्य पुण्य

इहलोकी हिशोब मिळाला

मम् अहंकार गळाला


आस्तिकतेची खोटी बिरुदे

समस्यांची उकल असु दे

आशेचा दिवा मावळला

पार धुळीला मिळाला


कुपातील मंडुक होतो

स्वविश्वात खुश होतो

गगनात अरूण आला

पार धुळीला मिळाला


ह्रदयाचे कवाड उघडले

अहंचे मळभ दूर झाले

स्वस्तित्वाचे ज्ञान झाले

त्रिवार वंदन तयाला


धन्यवाद प्रभुला

प्रभुच्या लेकरांना


Rate this content
Log in