चंचल
चंचल
पापण्यांची चलबिचल
मनानं कधीच हेरली होती
मागोवा ही नजरेनं घेऊन
ती आठवण छळत होती
कसे असेल ते चांदणे
कसे असेल ते रुपडे
मनात नाजूक विन
जी जुळत होती
क्षणात विरह क्षणात आठवण
खेळ चालला होता
भावनांचा
जणू वाटतं होता तो
ना सपणाऱ्या बंधाच्या
भावनांचा कवडसा

