चिंधीची झाली सिंधू
चिंधीची झाली सिंधू
सासु नवऱ्याच्या खाऊन लाथा
बाळंत झाली गोठ्यात
दिली काढून घरा बाहेरी
तान्हे मुलं तिच्या ओट्यात
जीव देण्या निघाली पण
जगण्याचे गवसले कारण
दीना अनाथ दुबळ्यांचे
घेतले तिने आई पण
त्या चिंधीचा झाला
एक भरजरी पितांबर
अनाथावरी तोलून धरले
तिने मायेचे अंबर
कधी मागितली भीक
तर कधी पसरला पदर
अशा रीतीने त्या चिंधीचा
जाहला एक भरजरी पितांबर
पतीलाही क्षमा केली
केला त्याचा सांभाळ
ठसठशीत कुंकवाने
सदैव भरलेले भाळ
डोईवरती पदर नजरेत
शीतलता चंद्राची
अशी झाली ती माय
सार्या दीन अनाथांची
सूर गवसला जगण्याचा
वसा घेतला जगवण्याचा
चिंधीची ची झाली सिंधू
सिंधुताई सपकाळ
आज अचानक तिजला
घेऊन गेला दुष्ट काळ
अनाथाच्या मायेची
अनाथ झाली बाळ
