Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasant

Abstract

2  

Vasant

Abstract

छत्रपती शिवराय

छत्रपती शिवराय

1 min
1.3K


अभिमान आहे शिवाचा, शोभे कपाळी समतेचा टिळा. जातीधर्मांनी आपण विणलेला सोडूया मनातला हो पिळा. राजांचे स्वराज्य होत ना हिंदू ना यवन, ते तर होते सर्वधर्मीय सुराज्यप्रेमी गुणी जनांचे.

थरकाप व्हावा निजामाचा अशी आपल्या राजांची मुद्रा. बंधू-भगिनी सर्वधर्मीय घ्यायचे निर्भयपणे निद्रा. राजाने आपल्या स्वराज्याचे तोरण बांधून सोडला निःश्वास. आपपरभाव सोडून त्यांनी ठेवला अष्टप्रधानांवर विश्वास. चुकीला माफीच नाही पण क्षमाशास्त्रही जपले. परस्त्रीला छेडणाऱ्यांचे पंख मुळापासून कापले. लाखांचे हात नकोत लाखांसाठी लढणारा हवा. राजांचे आदर्श राज्य आजही देई संदेश त्यांचा नवा. व्यभिचारी नरडी फोडणारा राजा शिवाजी वाघ होता सुराज्य नि स्वराज्य त्यांचे आठवू सकाळी जागे होता. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांचा राग होता. रक्त ओकणाऱ्या कुणब्यांचा राजा आपला बाग होता. शरणार्थीला अभय देणारा राजा आपला त्राता होता. शत्रूच्याही कबरीला जागा देणारा दाता होता. राज्यशास्त्राचा अभ्यास शिवरायांचा टणक होता. शहाजींचा पुत्र थोर हा नीतिशास्त्राचा जनक होता. शिवासारखे पुत्ररत्न पोटी; सलाम जिजाऊ माँ साहेबांना. शिवनेरीच्या कुशीत घडलेल्या सलाम स्वराज्य शिवरायांना!

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract