चैतन्याचे चांदणे
चैतन्याचे चांदणे


सखी जडलीय गं प्रीती
पडलीय भूरळ दिलावर
नाही हिंमत सांगण्याची
काळीज झालं खालीवर
लख्ख चैतन्याचे चांदणे
बरसेल रोज माझ्या दारी
तिमिरातुनी प्रकाशवाटा
दाखवूया दूनियेला सारी
स्नेहार्द्र गोडवा मनातला
नात्यागोत्यातही दिसावा
ऋणानुबंध जोडू प्रेमाचा
रेशमी स्नेहबंधच असावा
प्रीतीच्या हळूवार धाग्यांत
प्रीतपाखरांचे नाते नाजूक
जोडूनी स्नेहाभावाने घट्ट
गरम पोळीवर तूप साजूक
टिकवू नाते ऋणानुबंधाचे
जपूनी नाती माणुसकीची
हौसमौजही पुरी करूया
प्रीत वसली हृदयांतरीची