चारोळ्या संग्रह...!
चारोळ्या संग्रह...!
(१)
गुलाब हाती घेताना
काटा बोचत असतो
फुलाचे सौंदर्य खुलवण्यात
त्याचाही हातभार असतो..!
(२)
काटा असला तरी
सुवास आहे स्नेहाचा
विविध रंगाने फुलणारा
तुझाच रंग गुलाबाचा...!
(३)
कातरवेळी तुझी वाट
मनात दाटून येते
भान हरपून सारे
तुझीच होऊन जाते...
(४)
प्रेम करावे असे
जे कायम निरपेक्ष असावे
गुलाब काटेरी असून
प्रेमाचे प्रतिक आहे जसे.!
(५)
चांदणे आज अचानक
आभाळात चमकून उठले
तुझे जवळ असण्याचे भास
हृदयाला सांगून चुकले...!

