चाचा नेहरू
चाचा नेहरू
आगाध तुमची कीर्ती नेहरू,
आगाध तुमची किमया.
स्वतंत्र भारत करण्यासाठी,
झिजविली तुम्ही काया.
आगाध तुमचे शिक्षण नेहरू,
आगाध तुमचे बोल.
शुभ्र कपडे तुमचे नेहरू,
त्यावर शोभे गुलाब फुल.
भारतरत्न नेहरू तुम्ही,
आवडते तुम्हा लहान मुल.
कमला पत्नी इंदिरा कन्या,
शोभे तुमचे कुल.
आगाध तुमची कीर्ती नेहरू,
आगाध तुमची किमया.
स्वतंत्र भारत करण्यासाठी,
झिजविली तुम्ही काया.
सत्य अहिंसेची शिकवन देऊनी,
फुलविले तुम्ही स्वातंत्र्य फुल.
बॅरिस्टर तुम्ही झाला नेहरू,
पंतप्रधान ही तुम्ही झाला.
देश स्वतंत्र करूनी तुम्ही,
स्वातंत्र्याचा मंत्र आम्हाला दिला
