STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

बळीराजाची हाक

बळीराजाची हाक

1 min
384

नाही पिकविमा यंदा

किती काढावेत कर्ज

जीव गेला दमुनिया

रोज करूनिया अर्ज.....!!


नाही शेतमाला भाव

गेली कंबर मोडून

ऐक शासना ग-हाणं

दोन्ही हात रे जोडून....!!


झाले सावकारी कर्ज

नको झाला आता जीव

शेतकरी पोशिंदा तो

कशी नाही येत कीव.....!!


लाईनबील ते अमाप

आता कशानं भरावं

पोरंबाळं जगवावं

की उपाशीच मरावं......!!


सा-या जगाचा पोशिंदा

ऐक बळीराजाची हाक

नको करू हेटाळणी

नको रोजचाच धाक.....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy