STORYMIRROR

Arjun Sutar

Inspirational

4  

Arjun Sutar

Inspirational

भूत

भूत

1 min
403

 रात्रीच्या काळोखात,
मज निज काही येईना...
आयुष्याच्या प्रवासात,
हे भूत मला जगू देईना.

कितीही ही लांब गेले,
तरी फिरून समोर येते,
मनाच्या संघर्षात,
पुन्हा डोळ्यासमोर तेच दिसते.

कितीही पाठ फिरवली,
तरी गाण्यांतून ऐकू येते,
आणि कवितेच्या शब्दांतून,
माझ्याशीच बोलू पाहते.

शब्दांचा हा योगी,
भान हरपून गेला,
भूताच्या सादांनी,
लेखनासाठी जागा झाला

असं हे भूत मनावर राज्य करतं,
क्षणोक्षणी विचारांना प्रवृत्त करतं,
आणि लेखणीच्या रूपात,
नेहमी मनातच घर करून राहतं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Arjun Sutar

Similar marathi poem from Inspirational