पुस्तक
पुस्तक
मनात आले आज एक कविता करून पाहावे
आपल्या भावना मातृभाषेत सांगुन बघावे
खूप विचार केला पण शब्द काही सुचेना
काही केल्या शब्दांचे यमक काही जुळेना.
का कोणास ठाऊक एक कवितेचे ओळ सुचेना
काही केल्या माझ्या मनाला चैन काही पडेना
माझ्या जुन्या आठवणी मलाच सांगता येईना
नजर गेली कपाटाकडे एक पुस्तक सापडेना
मोकळ्या कपाटाकडे बघून चूक मला उमगली
कथा कादंबरी नाटक यांची पुस्तके कुठे हरवली
का कोणास ठाऊक एवढी मोठी चूक कशी घडली
माझी मायमराठी माझ्यापासुन फार फार दुरावली
पुन्हा एकदा सुरुवात नव्याने करेन म्हणतो
कविता, अभंग, पोवाडे पुन्हा एकदा ऐकतो
कथा,कादंबरी आणि नाटक रोज रोज वाचेन
माझ्या मराठी भाषेची अविरत सेवा करेन
पुस्तकांची मैत्री पुन्हा कधीच नाही तोडणार
आयुष्यभर तुझा एक सेवक बनून जगणार
माझ्या मराठी भाषेची थोरवी सर्वाना सांगणार
माय मराठीची थोर परंपरा मी पुढे चालवणार
