भटकंतीत निघालेलं माझं आयुष्य
भटकंतीत निघालेलं माझं आयुष्य
भटकंतीत निघालेलं माझं आयुष्य
विसाव्याला कधीतरी थांबावे म्हणतं..
पांथस्त बनूनी जरी चाललो निरंतर
आठवणींचा भार सोबत वाहू पाहतं..
भटकंतीत निघालेलं माझं आयुष्य
ऊन वारा पाऊस सुख दुःखापरी झेलतं..
अनुभवाचं गाठोड घेऊन सोबत कायम
चुकलेल्या वाटेवर नवा मार्ग शोधतं..
भटकंतीत निघालेलं माझं आयुष्य
खडकाळ वाटेवर कधी निराशही होतं
स्वप्नाळू मन स्वप्नांना घेऊन उराशी
लढण्याचं बळ अंगी वाढवतच जातं
भटकंतीत निघालेलं माझं आयुष्य
हसतं रडतं कधी वाऱ्यासोबत फिरतं..
सुखाच्या शोधात वणवण भटकल्यावर
ओंजळभर सुख कधी नशिबी मिळतं..
भटकंतीत निघालेलं माझं आयुष्य
मिळवलं काय गमावलं काय ह्याचा हिशेबीपणात फसतं..
जोडलेल्या प्रत्येक नात्याच्या बंधाला आपलंस करत
आयुष्यभर कर्म, कर्तव्य, कर्तृत्वासाठी राबतच राहतं..
