जागर स्त्री शक्तीचा
जागर स्त्री शक्तीचा
1 min
216
जागर स्त्री शक्तीचा
आदिमायेचा भवानीमातेचा
ममतेचा नी कर्तृत्वाचा
प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाचा..
जागर स्त्री शक्तीचा
आदिशक्तीचा दुर्गामातेचा
कर्तव्यात कसूर न करणाऱ्या
स्त्रीच्या अस्तित्वाचा..
जागर स्त्री शक्तीचा
अंबाबाईचा अन्नपुर्णमातेचा
जबाबदारी पार पाडणाऱ्या
प्रत्येक गृहिणीचा..
जागर स्त्री शक्तीचा
सरस्वतीमातेचा शिक्षण महतीचा
समाजात प्रतिष्ठा मिळवणाऱ्या
प्रत्येक तेजस्विनीचा..
जागर स्त्री शक्तीचा
महाकालीचा रणरागिणीचा
डॉक्टर, नर्स नी हातात झाडू घेणाऱ्या
प्रत्येक सेविकेचा..
