उन्हाळा
उन्हाळा
1 min
179
ग्रीष्माची दाहकता
होरपळते अंगास..
पर्जन्याचे थेंब वाटे
भिजवून जावे मनास..
तप्त तो ज्वालामुखी
जणू प्रखर त्या उन्हात..
उष्मा हा जीवघेणा
चणचण पाण्याची गावात..
आमराईचा मोहर मात्र
दरवळतो मनामनात..
गोड मधाळ गरे
काटेरी त्या फणसात..
करवंद नी जांभळांचा
आस्वाद असे ध्यानात..
गावातल्या आठवणींत
मन धुंद होई क्षणात..
उन्हाळा सुट्टीचा
वाटे यावा जीवनात..
गावाला भेट द्यावी
थोडस जगाव आपलेपणात..
