आधार
आधार
1 min
224
आधाराची गरज हवी असते ना प्रत्येकाला
आधारा शिवाय वेलीचे जगणे कळेल का या जगाला..
आधार हवा एकमेकांना खडतर प्रवास चालण्यासाठी
जीवनाच्या वाटेवर चालताना आधाराची शाश्वती मोठी..
आधार हवा विश्वासाचा, प्रेमाचा, सोबतीचा नी शब्दांचा
शब्द ही पुरेसे प्रेमाचे मिळता आधार मायेचा..
आधारात मिळे निश्चिती,भीती जाते हरण्याची
ताकद असते आधारात स्वप्नांना सत्यात उतरविण्याची..
आधार हा भक्कम पाया कोणत्याही नात्याचा
तिमीरातून प्रकाशाची वाटचाल करण्याचा..
आधाराशी नाते जवळचे स्वतःच्याच मनाचे
मनाने दिला आधार तर सुख मिळते स्वप्नपूर्तीचे...
आधाराची सत्यता मनास वाटे किती जवळची
तीन अक्षरी शब्दांत सामर्थ्य जग जिंकण्याची..
