STORYMIRROR

vaishali vartak

Action

2  

vaishali vartak

Action

भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

1 min
48

रुजले जाते बालपणातच

बाळकडू भ्रष्टचाराचे

काम करुन घेण्यास 

दावी अमीष प्रलोभनाचे


भ्रष्ट वर्तन असे ...भ्रष्टाचार 

दिसतोय तो सर्व ची थरात

भ्रष्ट असती सारे लहान महान

सर्व तंत्रची,...सडलेले मुळात


वशिलेवाले जाती पुढे

 रहाती होतकरू मागे

देउन पैसा मिळवती जागा

बुद्धिमाना चे न जुळती धागे


भ्रष्टाचार करणा-याची

विवेक बुध्दी  होते नष्ट

भ्रष्टाचार हाची शिष्टाचार

मानू लागलेय जग ,स्पष्ट


सारे मिळूनी करुया नष्ट 

जगुया सदा स्वाभिमानाने

स्वकष्टाची , आत्म बलाची

मिळवू भाकर अभिमानाने


लावू आता एकची नारा 

भ्रष्टाचाराला घालू आळा

 भारत देश आपला प्यारा

मानवा, थांबव आता घोटाळा


भ्रष्टाचारास आळा घालण्या

जन जागृती करुया मिळूनी

तरच चांगली पिढी घडेल 

उद्या नवा आदर्श घेऊनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action