STORYMIRROR

Gajanan Pote

Classics Inspirational Others

3  

Gajanan Pote

Classics Inspirational Others

बहरला वसंत

बहरला वसंत

1 min
272

नव चैतन्य नवी पालवी 

नटली वृक्ष राजी 

आम्रतरु तो बहरुन आला 

मोहर त्याचा असे साजरा 

कधी उष्ण कधी गारवा 

वाहे चहूकडे अवखळ वारा 

कोकिळ तो कुठे लपला 

मंजूळ स्वर त्याचा ऐकू आला 

वसंत हा असा बहरला 

नव चैतन्य, वृक्ष पालवीने हा नटला 

हर्ष उल्हास मनी दाटला 

वसंत नवी उमेद जागवून गेला 

ऋतू राज हा असे साजरा 

बहरला वसंतात सोहळा 

वाहे आनंदाचा चोहीकडे वारा 

बहरला वसंत हा घेऊन संसार सारा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics