बहर प्रीतीचा (अष्टक्षरी)
बहर प्रीतीचा (अष्टक्षरी)


थंडी रम्य पहाटेची
वाट विरली धुक्यात
किलबिल पाखरांची
पडे सुस्वर कानात
गार वारा भोवताली
येई अंगा शिरशिरी
अशा मंगल समयी
मनी वाजते पावरी
शीतवारा संगतीला
अन् तुझ्या आठवणी
उलगडे अलगद
भावनांच्या साठवणी
देई हात हाती माझ्या
राहू दोघेही आनंदी
साथ तुझी अनमोल
विवाहात सप्तपदी