भक्ती
भक्ती

1 min

37
स्वामी माझा आत्मा
माझ्यातील रे जीव
श्वास घेतो मी
माझी तुला रे कीव..
स्वामी माझी माय
जीवनात दुधावरची साय
आयुष्यात काही कमी नाय
पाठीशी तुच हाय..
सण असो उत्सव
भुकेल्यांना देऊ अन्न
नित्य असावा गंध
भक्तीत स्वामी प्रसन्न..
पुण्याई साता जन्माची
स्वामी सेवेत आलो
भाग्यवान आम्ही
समर्थ सेवेकरी झालो..
स्वामीच भाग्यविधाता
विश्वाचा रे तू मालक
भक्ती तुझीच राहू दे आता
या वसुधेचा तुच चालक