गुरुमाऊली
गुरुमाऊली
1 min
64
दिंडोरी हे गाव
माझी रे पंढरी
करतो ही वारी
वर्षातून।।
गुरुमाऊली तू
विठोबाचे रुप
सदा तुझा जप
मनामध्ये।।
विज्ञान सांगड
आध्यात्मिक सेवा
मिळतो हा मेवा
दरबारी।।
गुरुपीठ माझे
ऊर्जा एक स्रोत
पेटती ही ज्योत
अंतरीची।।
देहभान मी
स्वामी सेवेकरी
दुःख तुम्ही हरी
स्वामीराया।।
गरजुंची सेवा
भरुनी ये मन
माऊली प्रसन्न
सर्वांसाठी!!