आठवण
आठवण
1 min
25
कारंजा हे गाव
आईची पंढरी
करीन मी वारी
तुझ्यासाठी।।
आई तू नसताना
कसे पाहू रुप
सदा तुझा जप
मनामध्ये।।
तुझीच आठवण
झाली हातून सेवा
मिळतो हा मेवा
तुझ्याकृपे।।
डोळ्यात पाणी
तुझी रे आठवण
शिदोरी साठवण
आयुष्याची।।
देहभान मी असा
तुझ्या विचारात
जोडुनी गं हात
संस्काराला।।
पुण्यवान मी
जन्म तुझ्या पोटी
विश्वात तू मोठी
माझ्यासाठी।।
