जीवन
जीवन
साथ तुझी अन् माझी
जन्मोजन्मी अशीच राहील
प्रेमात सदैव बरसणार
स्नेहात ओलाचिंब ठेवील...
नातं प्रेमाचे असो वा मैत्रीचे
बंधने मनापासून गुंफवावी
सोबतीने धरुन हात एकमेकांचे
यशाची शिखरे ही गाठावी...
पावसासारखा लहरीपणा
माझ्या प्रेमात नसेल
असो सुख-दुःख जीवनात
प्रत्येक क्षण तुझाच असेल...
जीव रे तुझ्यात
हे बंध रेशमाचे
जीवन वाहुनी तुला
समर्पण तुला प्रेमाचे