STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

भीती

भीती

1 min
341

बरबाद झालो मी चालेना मती 

बईमान जगाची मला वाटे भीती.....


शिकलो तरी कुणी विचारत नाही 

जीवनाची मी केली सुरवात नाही 

मंदावली माझ्या भविष्याची गती....


बिकट अवस्था कठीण ही गरीबी 

लाचार आहे मी खूप दुःख हिशोबी

हळूहळू दुर झाल्या नात्यांच्या पाती.....


परिवाराच कसं करू मी हो पालन 

बेरोजगार खिशात ना माझ्या चलन

सुख ही माझ्या दुःखाचे गीतं गाती.....


त्रास झाला तरी संगम हरणार नाही 

उपाशी आहे मी कधी रडणार नाही 

मुठीत आणीन जग मग फूगेल छाती.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy