भेट
भेट
पाऊल पडता सख्या तुझे
हृदयात माझ्या धडधडले
घेता जवळ मज तू मिठीत
अंगावरी असे सरसरे...ll१ll
ओठावरी ओठ ठेवता
आस ती जागली मनी
हळूहळू धुंदी चढली..
गेले घायाळ होऊनी...ll२ll
तुझ्या हळूवार स्पर्शाने
मोहरले मज अंग सारे
चुंबनाने अधीर मन झाले
बेभान सुटले रे.. वारे...ll३ll
सांग प्रिया कशाची ही ओढ रे
तना-मनात उठले का काहूर रे
बाहुत तुझ्या विसावा मी घेता
बेधुंद होऊन झोकून दिले सारे..ll४ll
तुझ्या सहवासात प्रेमाने
भेटीत मिटले काहूर सारे
बंद झाली मनातली हूरहूर
आणि शांत झाले वारे ...ll५ll