STORYMIRROR

Poonam Kulkarni

Romance

4  

Poonam Kulkarni

Romance

भेट

भेट

1 min
23.3K

भेट त्या जुन्या वाटेवरती,

चालूया हातात हात घालुनी...

मी येईल नववधुसारखी,

तू देशील गजरा माळूनी.


भेट त्या जुन्या वाटेवरती,

सजवूनी परत गप्पांची मैफिल..

हरवून जाऊ पूर्वीसारखं,

राहू जगापासून गाफील.


भेट त्या जुन्या वाटेवरती,

पडेल तो गुलमोहराचा सडा...

परत एकदा रंगेल मग,

आपल्या भेटीचा तो सोहळा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance