STORYMIRROR

Prashant Kadam

Romance Inspirational

3  

Prashant Kadam

Romance Inspirational

भेट तुझी माझी

भेट तुझी माझी

1 min
320

भेट तुझी माझी स्मरते 

अजूनही ती पूर्वीची 

आतुरता हृदयात असायची

तुला भेटण्याची 


तासनतास पहात बसायचो

वाट तुझ्या येण्याची 

अधिरता मनात असायची

तुला पाहण्याची 


दिवसरात्र विचार डोक्यात 

तुझाच तर असायचा

तुझे प्रेम मिळविण्यासाठी 

जीव तळमळायचा


असेच काहीसे झाले मजला

आता ही अनेक वर्षांनी

इस्पितळात पडलो असता

मात्र दूर फक्त मनानी


आठवण तुझीच असायची 

झोप ही नसायची

चिंता तूझ्या डोळ्यांमधली

सतत मला दिसायची


किती धैर्य दाखवले होतेस

काळजी घेतलीस माझी

माझे बरे होवून घरी येणे

ही खरी किमया तुझी


आतुरता हृदयात आहे

अजूनही ती पूर्वीची 

साथ कधी न सुटावी

ही हाक अंतरीची


असे निरंतर प्रेम आपले

बहरतच सदा राहवे

मनात अजूनही तसेच वाटते

डोळ्यांत सतत तुझ्या पहावे


भेट तुझी माझी स्मरते 

अजूनही ती पूर्वीची 

आतुरता हृदयात असायची

तुला भेटण्याची 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance