STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

भेट पावसातली

भेट पावसातली

1 min
258

आठवणींच्या गाठोड्याची सोडता गाठ

पावसातली भेट आपली आठवे दाट


चिंब भिजूनी सखी बिलगली दाट रानात

रिमझिम पाणी झुळझुळ गाणी फिरे अंगात


चुंबन घडता चढे पाऊस मग मुसळधार

वीज कडाडे बाहूत मिळे तुझ्या आधार


तोड बंधना पुरे वंचना मनाचे भास

चिंब होवून थेंब पिऊनी नाचली खास


टपटप टपटप झरझर झरझर सरीवर सरी

चिंब चिंब गं थेंब थेंब गं जशी जलपरी


खळखळ खळखळ झरे वाहती तालावर गं

थरथर थरथर हात कंपती देहावर गं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance