STORYMIRROR

Mala Malsamindr

Tragedy Others

3  

Mala Malsamindr

Tragedy Others

भेगा

भेगा

1 min
12.2K

किती पडल्या आहेत जमिनीला भेगा 

का खेळत आहेस निराळा खेळ रे तू मेघा 

किती कडा डोळ्यांच्या माझ्या ओलावल्या

आसवांच्या धारा तर गीळूनच मी घेतल्या 


हृदयातून तर शेतकरी तर भेदरूनच गेला

त्याच्या पोटाला गच्च कावाच रे पडला

पोटात कावळ्यांचा काव काव सुरू झाला

मिळेल का घास त्याच्या भूकेजलेल्या पोटाला


शेतकरी मायचा तर पान्हाच आटला 

बाळ तर हंबरडा फोडून रडायला लागला 

न सोसवता शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त झाला

आणि घरातला करता पुरुषच मरून गेला 


डंक लागला तिच्या घरा - दाराला 

आग लागली तिच्या घर - संसाराला 

चवदा वर्षाचा पोरगा हॉस्टेलातून परतला

घामाने लटपट झाला व मायला धीरोसा दिला


त्याने शिक्षणाचा नाद सोडून जूपले नांगराला 

सहनशक्तीचा हिमतीने त्याने कळसच गाठला.


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Tragedy