भातुकली
भातुकली
मांडला खेळ
सुरू भातुकली
खेळे चिमुकली
जमला मेळ
जाई रमून
छोटी सुगरण
सजीव अंगण
स्वच्छ करून
माझी बाहुली
दिसते गं छान
तिला आहे मान
म्हणे मनुली
बाजारातून
आवडीची भाजी
आणी ताजीताजी
ठेवी रांधून
गोडाधोडाचा
स्वयंपाक करी
मोद पोट भरी
क्षणाक्षणाचा
अंगणी राणी
जेवायला बसे
खुदकन हसे
गाई ती गाणी
