STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

भास आभास..

भास आभास..

1 min
211

भास आभास

कोणते भास खरे? कोणते आभास खरे?

माणसे भास की आदर्श आभास?

व्यक्तिमत्वें नसतांना 

लोटांगण घातलेले पाय ते हेच होते का?

जे कारागृहात बंदिस्त झाले ओठ

फटाक्यांनी भरलेले अननस

देणारे, संतांना काठीने मारणारे

 हात ते हेच होतेका?

गुडघ्यानी मरेपर्यंत मान दाबणारे 

पाय ते हेच होते कां?

घाण्याच्या बैलाच्या जागी 

माणसाला जुंपणारे 

हृदय ते हेच कां?

गॅस चेंबर मध्ये गुदमरून मारणारें 

मन ते हेच कांं?

शब्दांचे संदर्भ बदलतात माहीत होतं, पण अवयवाचे सुद्धा संदर्भ बदलतात

माणसे खून करतात पण अवयव ही कातील कसे?

माणसांना संपवण्यात माणसेच कसे सामील?

प्रतिमा दुभंगत नाही तो पर्यंत माणसे देवंच असतात

आदर्श आणि आदर्शाच्यांचे पुतळे जोपर्यंत 

उधवस्थ होत नाहीत तोपर्यंत माणसे आदर्शच असतात

न्यायदेवता आंधळी असते म्हणून अनेकांनी न्याय स्वतःच्याच हातातच घेतला आहे

गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत माथा उजळंच असतो.

तडा गेलेल्या श्रद्धेला अंधश्रद्धेनं लिंपणं बंद व्हायला हवं. 

कोणत्याही दगडाला शेंदूर किती दिवस फासणार व आभासी भक्तगण किती निर्माण करणार?

केव्हा मनें झाली बोथट 

कशी माणसें झाली तुटक

 कोणते भास कोणते आभास कळलेच नाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract