STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

बेरोजगारी..

बेरोजगारी..

1 min
312

शिकण्यात गेले अर्धे आयुष्य

शिकून करावे काय...

शेवटी नशिबी बेरोजगारी

जीवन वायाच हे जाय.


आई बाप म्हातारे,बिचारे

थकले राबूनी जीवनभर,

ऐतखाऊ मी बेरोजगार

झालो आहे भूईला भार.


नोकरीचा पत्ता नाही

कमाई कसली मुळीच नाही,

वय लग्नाच संपून गेलं

पोरगीच कोणी देत नाही.


आली लग्नाला बहीण ही

डोंगर कर्जाचा लई ,

बाप मागतो मरण रोज

आईच्या डोळ्यात पाणी येई.


जगतोय जीनं केविलवाणं

खिसा फाटका नशीब हे काय,

कळेना जगावं का मरावं

बेरोजगारी शापच हाय.


काढतोय मार्ग ठेवून हिंमत

जीद्द जगण्याची मनात धरून,

बेरोजगारीवर करतोय मात

कुक्कुट, वराह, बकरी पालन करून.


बेरोजगारांनो घ्या वसा

हिंमत मर्दा नको हरु,

लाज कसली रे कष्टाला

बेरोजगारीवर मात करू.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational