STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

बेहिशोबी प्रेम

बेहिशोबी प्रेम

1 min
115

 प्रेम हे जीवनासाठी अमृतच आहे

 त्याची व्याख्या करता येणार नाही

 प्रेम कोणावर तरी करूनच पहावे

 आभासी जगातील भासमान सारे काही....


 नजरेला नजरेची भाषा चटकन समजते

 मऊ मुलायम स्पर्शांचा आनंदमयी हा खेळ

 शब्दांची गरज त्यावेळी अजिबात नसते

 सुखात नाहण्याची हीच असते वेळ....


 मनाच्या कोपऱ्यातील आगतिक खळबळ

 प्रेमाच्या फुलण्याला सुगंधीत अत्तराचा वास

 मिठीच्या पाशात रासक्रीडा चाले खास

 शृंगारवेळी एकमेकात गुंतले मोकळे श्वास...


 घेतले मिठीत शांत कर आता मनाला

 बावरले मन खूपच होते शांत,शांत

 बेहिशोबी प्रेमाच्या वर्षावाने बेधुंद झाली तनू

 प्रेमापुढे नाही आता कोणातीच भ्रांत....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance