STORYMIRROR

Geeta Madare

Inspirational

3  

Geeta Madare

Inspirational

बाप

बाप

1 min
260

माय आणि लेकराचा 

सुवर्णमध्य असतो बाप 

दोघांच्याही जीवनातला

पद्य गद्य असतो बाप


     आईचं पहिलं आणि            

     शेवटचं गाव असतो बाप

     जन्म देते आई पण 

     हक्काचं नाव असतो बाप


अंगाअंगात भिनलेल्या

रक्ताचा दाता असतो बाप

न दाखवता माया करणारा

मायाळू माता असतो बाप


     कुटुंबासाठी गळणाऱ्या 

     घामाचा झरा असतो बाप

     कितीही जुना झाला तरी

    रोजच नवाकोरा असतो बाप


धीर, हिम्मत, जिद्द मुलास

देणारा असतो बाप

मुलाच्या हातून फक्त अग्नी

घेणारा असतो बाप


  त्याच अग्नीतली ठिणगी होऊन

  प्रेरणा मुलास देतो बाप

  सगळी कर्तव्ये पार पाडूनच

   मोकळा श्वास घेतो बाप


कुटुंबातल्या हर एकासाठी

धडपडणारा असतो बाप

प्रत्येकाच्या दुःखामध्ये

तडफडणारा असतो बाप


   उपकार तुझे सांग 'बा'

   फेडू तरी कसे?

   तुझ्या मरणाला हिम्मत हारून

   रडू तरी कसे? 

   मी रडू तरी कसे?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational