इंटरनेट
इंटरनेट
1 min
265
इंटरनेटच्या जाळ्यात माणूस
असा काही अडकला
लोकशाहीच्या माझ्या देशात
अमानुषतेचा ध्वज फडकला ।।
घरातले संवाद आता
घरातल्यांनाच महाग झाले
मिडीयावरचे रिप्लाय मात्र
आयुष्याचा भाग झाले ।।
ट्विटरवरून मोठे मोठे
वाद उसळू लागले
थोर मोठे माणसंही
धडाधड कोसळू लागले ।।
बसल्याजागी युट्यूब वरून
पैसे कमावू लागले
सेल्फीच्या नादात किती
लोक जीव गमावू लागले ।।
देवमाणसंही आता
जंगली प्राण्यांसारखे वागताय
प्रेतासोबतच्या फोटोलाही
लाइक अँड शेअर मागताय ।।
अश्लील एमएमएसच्या भीतीने
मुली झाल्या ब्लँकमिल
भयभीत मुलींसारखीच झाली
कमी पक्ष्यांचीही किलबिल ।।
कधी होईल देश माझा
स्वतंत्र या जाळ्यातून
गळताहेत ना अश्रू माझ्या
भारतमातेच्या डोळ्यांतून ।।
